संग्राम जगताप यांनी बोलावली बैठक,राष्ट्रवादीचे नगरसेवक देणार एकत्रित खुलासा

 टीम महाराष्ट्र देशा- महापालिकेत महापौर निवडणुकीच्या वेळी भाजपला पाठिंबा दिल्याने  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची राज्यभरात नाचक्की झाली. वरिष्ठांना विश्वासात न घेता भाजपला पाठींबा दिलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना  पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र या सर्व  नगरसेवकांनी अद्याप खुलासे दिलेले नाहीत. याबाबत सोमवारी नगरमध्ये एकत्रित बैठक घेऊन सर्वांचा एकच खुलासा सादर करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
विशेष म्हणजे  आमदार  संग्राम जगताप हे स्वतः ही बैठक घेणार आहेत. तसेच नगरसेवकांचा खुलासा घेऊन फक्त जगताप यांनी पक्ष श्रेष्ठींकडे जायचे की सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन जायचे, याबाबतही या बैठकीत निर्णय होणार आहे.
दरम्यान, काल राष्ट्रवादीची अहमदनगर लोकसभेच्या जागेसाठी चर्चा झाली. मात्र नगरची चर्चा असूनही राष्ट्रवादीने स्थानिक आमदार संग्राम जगताप यांना आमंत्रणच दिलं नाही.नगर जिल्ह्यातील सर्व प्रतिनधी चर्चेला उपस्थित असताना, संग्राम जगताप यांची गैरहजेरी लक्ष वेधून घेणारी होती. नगर महापालिकेत संग्राम जगताप यांच्या सांगण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपला पाठींबा दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला संग्राम जगताप यांना आमंत्रित केलं नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

1 Comment

Click here to post a comment