संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार यांचा विजय निश्चित; चंद्रकांत पाटलांना गाढा विश्वास

chandrakant patil

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मधे पदवीधर आणि शिक्षक मतदारांची भेट घेऊन पदवीधर चे उमेदवार संग्राम देशमुख आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र पवार यांचा प्रचार करताना त्यांचा विजय सुनिश्चित असल्याचे सांगितले.

प्रभाग १३ एरंडवणे हॅपी कॉलनी येथील झंझावाती प्रचार दौऱ्यात त्यांनी पिनाक मेमरीज,मनीषा सोसायटी,चिंतामणी सोसायटी यासह विविध ठिकाणी पदवीधर मतदारांच्या भेटी घेतल्या.यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे पुणे शहर मुख्य प्रवक्ता संदीप खर्डेकर,कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,नगरसेवक व भाजप पुणे शहर सरचिटणीस दीपक पोटे,नगरसेवक जयंत भावे,नगरसेवक सुशील मेंगडे,प्रभाग १३ चे अध्यक्ष राजेंद्र येडे,महिला मोर्चाच्या कोथरूड मंडल अध्यक्ष हर्षदा फरांदे,स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर,मंडल सरचिटणीस अनुराधा एडके,मंडल उपाध्यक्ष राज तांबोळी यांच्यासह विविध पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

निवडणूकीचे नियम वेगळे असतात व एका छोट्याशा चुकीमुळे आपले मत बाद होवू शकते असे सांगतानाच पाटील  यांनी त्यांच्या निवडणूकीत तब्बल ८५०० मते बाद झाल्याची आठवण सांगितली.मतदान करताना केंद्रात उपलब्ध असलेल्या पेन नेच आकडा लिहावयाचा असतो व त्याभोवती गोल किंवा इतर काही चिन्ह काढले तर मत बाद होते आणि त्याचबरोबर मतपत्रिका जशी दिली जाते तशीच घडी करुन पेटीत टाकायची असते असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.तसेच मतदान कसे करायचे याचे विस्तृत पत्रक मतदारां पर्यंत पोहोचवावे असे आवाहन ही कार्यकर्त्यांना केले.पुण्यातून आणि त्यातही कोथरूड मधून सर्वाधिक मतदान घडवू असे सर्व पदाधिकारी व नगरसेवकांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या