सांगोल्यातील वंचित गावांची तहान भागणार !

टीम महाराष्ट्र देशा : उरमोडीचे पाणी राजेवाडी (म्हसवड) तलावात सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उरमोडीमधून 10 क्युसेसच्या विसर्गाने राजेवाडी तलावात पाणी पोहचणार आहे. त्यानंतर ते पाणी कालव्यातून शेतकर्याना मिळणार आहे.

bagdure

उरमोडीच्या पाण्यासाठी सांगोला तालुका महिला महासंघाच्या अध्यक्षा राजश्रीताई नागणे मागील सहा महिन्यापासून प्रयत्न करत होत्या. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आहे. उरमोडीतील या पाण्याचा सांगोला तालुक्यातीलही खवासपूर, कटफळ, अचकदाणी, चिकमहूद, जाधववाडी, बंडगरवाडी अश्या अनेक गावांना फायदा होणार आहे.

सांगोला तालुका कायम दुष्काळी भागात मोडतो. तालुक्याचा पाण्यासाठीचा संघर्ष जगजाहीर आहे. सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख आजपर्यंत पाणी प्रश्नावर निवडणूक लढवत आले आहेत. राजश्रीताई नागणे यांनी सांगोल्यात पाणी आणून सांगोल्यातील आपली राजकीय दावेदारी नक्की केली आहे. एवढे मात्र नक्की…

You might also like
Comments
Loading...