महापुरामुळे सांगलीची बाजारपेठ उध्वस्त; शेतीमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

blank

टीम महाराष्ट्र देशा- कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्यांना आलेल्या पुरामुळे सांगलीची बाजारपेठ उध्वस्त झाली आहे. गेली आठ दिवस या ठिकाणची मुख्य बाजारपेठ आणि दुकाने पाण्यात आहेत. विक्रीसाठी आलेल्या शेतीमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान सांगली, कोल्हापूर, कर्नाटक आणि दक्षिण भारताला जोडणारी रेल्वेआणि रस्ते वाहतूक अद्यापही विस्कळीत आहे. हळद मिरची गुळ सोयाबीन या शेतीमालासाठी सांगलीची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथील कृषिमाल विक्रीसाठी सांगलीत आणला जातो. या ठिकाणाहून असणारी रस्ते आणि रेल्वे वाहतूक यामुळे इथल्या व्यापाराला उत्तेजन मिळाले आहे.

मुंबई आणि गुजरातचे व्यापारी माल खरेदी साठी सतत सांगलीशी संपर्क ठेवून असतात. या भागात नुसता शेतीमाल पिकवला जात नाही तर त्यावर प्रक्रिया करणारे कारखाने याठिकाणी उपलब्ध आहेत. गेली सहा दिवस बंद असणारी पुणे-बेंगलोर मार्गावरची रस्ते वाहतूक आजपासून सुरू होणार आहे. मात्र रुकडी गावाजवळ रूळ खराब झाल्यामुळे कोल्हापूर मिरज मार्गावरील रेल्वे वाहतूक आठवडाभर बंद राहणार आहे.

या मार्गाच्या दुरुस्तीचे काम रेल्वे विभागाने सुरू केले आहे. हे काम रात्रंदिवस सुरू असून रेल्वेसेवा लवकर रुळावर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. रस्तेमार्ग बंद असल्यामुळे लोकांचा प्रवासही थांबला होता आता पाणी उतरेल तसे हळूहळू हे मार्ग वाहतुकीसाठी खुले होत आहेत असं आमच्या वार्ताहराने कळवले आहे.

महत्वाच्या बातम्या