सांगली : अखेर महापौरपदाची माळ संगीता खोत यांच्या गळ्यात

सांगली : सांगली, मिरज कुपवाड महापालिकेत अभूतपूर्व असे यश मिळवत सत्ता परिवर्तन केल्यानंतर भाजपच्या पहिल्या महापौरपदी अखेर भाजपच्या संगीता खोत यांची सांगलीच्या महापौरपदी निवड झाली आहे.

संगीता खोत यांना ४२ तर काँग्रेसच्या वर्षा निंबाळकर यांना ३५ मते मिळाली आहेत. स्वाभिमानीचे विजय घाडगे तटस्थ आहेत. सांगलीच्या उपमहापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी विजयी झाले आहेत. सूर्यवंशी यांना ४२ तर राष्ट्रवादीच्या स्वाती पारधी यांना ३५ मते मिळाली आहेत.

केरळातील पूरग्रस्तांच्या मदतीला शिवसेना, आमदार, खासदार देणार एक महिन्याचे वेतन