fbpx

सांगली : महापौर-उपमहापौरपद निवडणूक, आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी

सांगली – काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. दोन्ही पक्षांकडून गुरुवारी (दि. 16) दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्यात येणार आहेत. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार आहे. महापौर-उपमहापौर निवड 20 ऑगस्ट रोजी दुपारी 11.30 वाजता जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत होणार आहे.

कॉंग्रेस राष्ट्रवादीला धोबीपछाड देत भाजपने सांगली महानगरपालिकेतील निवडणुकीत यश मिळवले आहे. महापालिकेत भाजपतर्फे पहिले महापौरपद मिळावे यासाठी देखील रस्सीखेच सुरू आहे.

पक्षातर्फे सात नगरसेविका इच्छुक आहेत. त्यापैकी कोअर कमिटीने चौघींची शिफारस केली आहे. हे पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असून कोअर कमिटीची बैठक होऊन सौ. संगीता खोत, कल्पना कोळेकर, सविता मदने आणि अनारकली कुरणे या चौघींच्या नावांची शिफारस प्रदेश कार्यकारिणीकडे केली आहे.

करमाळा : राजकीय कुरघोड्या अन् फोडाफोडीला आले उधाण

वर्ल्डकप 2019 चं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तानमध्ये ‘या’ तारखेला होणार महासंग्राम