सांगली : महापौरपद मिळविण्यासाठी भाजपमध्ये रस्सीखेच

सांगली : कॉंग्रेस राष्ट्रवादीला धोबीपछाड देत भाजपने सांगली महानगरपालिकेतील निवडणुकीत यश मिळवले आहे. महापालिकेत भाजपतर्फे पहिले महापौरपद मिळावे यासाठी रस्सीखेच सुरू आहे. महापौर आणि उपमहापौरपदासाठीच्या उमेदवारीचा फैसला बुधवारी होणार आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत कोअर कमिटी आणि पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक होणार आहे.

दरम्यान,पक्षातर्फे सात नगरसेविका इच्छुक आहेत. त्यापैकी कोअर कमिटीने चौघींची शिफारस केली आहे. हे पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वच पदांच्या निवडीचे सर्वाधिकार सांगलीतील कोअर कमिटीला दिले आहेत. त्यानुसार कोअर कमिटीची बैठक होऊन सौ. संगीता खोत, कल्पना कोळेकर, सविता मदने आणि अनारकली कुरणे या चौघींच्या नावांची शिफारस प्रदेश कार्यकारिणीकडे केली आहे.

आरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी