आघाडीचे संकेत मिळताच कॉंग्रेस राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक भाजपच्या संपर्कात

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात कॉंग्रेस – राष्ट्रवादीची जवळीक पाहता मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीसाठी सुद्धा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीचे संकेत मिळत आहेत. असे संकेत मिळू लागतातच आघाडीच्य काही विद्यमान नगरसेवकांनी भाजपशी संपर्क वाढविला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत.

यंदा भाजपने महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. गेल्या वर्षभरापासून नियोजनबद्धरित्या भाजपची वाटचाल सुरू आहे. मात्र आघाडीच्या उमेदवारांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यास भाजपमधील निष्ठावंत गट नाराज होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले असले तरी, अद्याप सांगली महापालिकेवर मात्र झेंडा फडकविता आलेला नाही. महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचाच वरचष्मा राहिला आहे.

You might also like
Comments
Loading...