भाजप – राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा ; ३ पोलीस जखमी

टीम महाराष्ट्र देशा : सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर येत तुफान दगफेक झाली आहे. या दगडफेकीत घटनास्थळी असलेले ३ पोलीस सुद्धा जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री हा हिंसाचार घडला आहे.

तासगाव येथे पोटनिवडणूक होणार असून या पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सोमवारी रात्री खासदार संजयकाका पाटील यांचे निकटवर्तीय आणि स्वीकृत नगरसेवक बाबासाहेब पाटील यांना धक्काबुक्की झाली. हे वृत्त समजताच भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष करण पवार आणि स्थानिक नेते तानाजी पवार यांच्या घरावर दगडफेक केली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार हाणामारी झाली.