मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. (Controversial statement about Chhatrapati Shivaji Maharaj) यावर महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर राष्ट्रवादीने आंदोलनाचा इशाराही दिला आहे. यावरच आता मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनीही प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.
“वयाच्या आणि अधिकाराच्या या टप्प्यावर एखाद्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहित नसावा हे न पटण्यासारखं आहे.जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास पसरवण्याचा उद्योग संघ परिवार अनेक वर्षे करत आला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराजांच्या इतिहासासोबत छेडछाड कराल तर महाराष्ट्र माफ करणार नाही.”, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करत दिला आहे.
वयाच्या आणि अधिकाराच्या या टप्प्यावर एखाद्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहित नसावा हे न पटण्यासारखं आहे.जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास पसरवण्याचा उद्योग संघ परिवार अनेक वर्षे करत आला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराजांच्या इतिहासासोबत छेडछाड कराल तर महाराष्ट्र माफ करणार नाही.
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) February 28, 2022
नेमके काय म्हणाले राज्यपाल?
औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले.
चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, आणि समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे त्यांच्या आईचे मोठे योगदान असते, तसंच आपल्या समाजात गुरूचे मोठे स्थान असते. तसेच शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले होते की, तुमच्या कृपेने मला राज्य मिळाले आहे, असे राज्यपाल म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
-
Russia-Ukraine war : शांतता पुनर्प्रस्थापित व्हावी म्हणून दलाई लामा यांनी केली प्रार्थना
-
“राजेंना कोणीही मानसिक त्रास देऊ नका”, संयोगिताराजे यांची हात जोडून विनंती
-
“शरणागती पत्करणार नाही आणि आमची…”; रशियाशी चर्चेपूर्वी युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य
-
“राजे स्वयंप्रकाशित होते”, राज्यपाल कोश्यारींच्या ‘त्या’ वक्तव्यावर वडेट्टीवार संतापले
- “…पैकी फक्त ९०० विद्यार्थी परतले; केंद्राने फार मोठा तीर मारला नाही”, वडेट्टीवारांची टीका
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<