‘संगीत शंकर दरबार’ महोत्सव रद्द-अशोक चव्हाण

Big blow to Ashok Chavan in Nanded; Shiv Sena's saffron in 16 out of 17 seats

नांदेड : माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी नांदेडमध्ये होणारा संगीत शंकर दरबार महोत्सव रद्द केला असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे सांगितले. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी ऑनलाइन संवाद साधला.

आपल्या भाषणातून सामजिक, राजकीय कार्यक्रम न घेण्याचे आवाहन विविध पक्ष, संघटना व लोकप्रतिनिधींना या वेळी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद मंत्री चव्हाण यांनी दिला आहे. राज्य कोरोनाच्या पुन्हा लाटेच्या उंबरठ्यावर उभे आहे. सरकारमधील अर्धा डझन मंत्र्यांना एका मागे एक अशी कोरोनाची लागण होत आहे. नागपूर, अमरावती, मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी लाइव्ह संवाद साधला.

कोरोना, लॉकडाऊन मार्चच्या तिसऱ्या आढवड्यापासून लागल्यानंतर पहिल्या टप्यात जशी नागरिकांनी काळजी घेतली. तशीच काळजी पुन्हा घ्यावी लागणार आहे. ठाकरे यांनी सार्वजनिक, सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय कार्यक्रम न घेण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी प्रतिसाद दिला. तर सर्व पुर्वनियोजित कार्यक्रम रद्द केले. स्व. शंकरराव चव्हाण संगीत शंकर दरबार या महोत्सवाला नांदेडसह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने रसिक हजेरी लावत असतात. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा बनली आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढता धोका लक्षात घेता, तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अशोक चव्हाण यांनी यंदाचा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

महत्वाच्या बातम्या