महापालिका सभागृहातच नगरसेविकेने फोडले स्वत:चे डोके

सांगली: आयुक्त लोकहिताच्या फाईल मंजूर करत नसल्याचा संतापातून सांगली महापालिकेतील नगरसेविका सुरेखा कांबळे यांनी महापालिका सभागृहात डोके फोडून घेण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत हा सर्व प्रकार घडला आहे.

सांगली महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा आज पार पडली. यावेळी नगरसेविका सुरेखा कांबळे यांनी आयुक्तांकडे असणाऱ्या प्रलंबित फायलींचा मुद्दा उपस्थित केला. आयुक्त फाईल मंजूर करत नसल्याचा संताप झाल्याने कांबळे यांनी सोबत आणलेल्या दगडाने डोके फोडून घेण्याचा प्रयत्न केला. बाजूला बसलेल्या अन्य महिला सदस्यांनी त्यांना अडवल्याने पुढचा अनर्थ टळला.

Loading...