मनसेचे ‘हे’ ओपन चॅलेंज विनोद तावडे स्वीकारणार का ?

vinod tawade maharashtra desha

मुंबई: मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. यानंतर आता भाजपकडून राज यांना टार्गेट केल जात आहे. ‘ राहुल गांधी हे पंतप्रधान म्हणून शरद पवारांना चालतील का, हे आधी शरद पवारांना विचारावं, अन्यथा राज यांना पुढच्या स्क्रिप्ट मिळणार नाहीत, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लगावला आहे.

भाजपच्या प्रत्युत्तराला मनसेने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी विनोद तावडे यांचा चांगलाच समाचार घेतला. विनोद तावडेच नव्हे, भाजपच्या तमाम नेत्यांना माझं आव्हान आहे की, त्यांच्यात हिंमत असेल, जे प्रश्न राजसाहेबांनी विचारले आहेत, हिंमत असेल तर मुद्देसूद उत्तरे द्यावीत अन्यथा फालतू बडबड बंद करावी असं त्यांनी म्हटलं आहे.

विनोद तावडेंमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी आमच्यासोबत हरिसालला यावं. आमची एक तरी गोष्ट खोटी ठरली, तर मी राजकारण सोडायला तयार आहे किंवा त्यांनी तरी राजकारण सोडावं, हे माझं त्यांनी खुलं आव्हान आहे असं देशपांडे म्हणाले.