महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘या’ झुंजार महिला नेत्याची लागली वर्णी

congress

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी यवतमाळच्या संध्या सव्वालाखे यांची निवड झाली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी त्यांच्या नियुक्तीचं पत्र काल प्रसिद्धीस दिलं.

संध्या सव्वालाखे ह्यांनी यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली असून त्या यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सदस्य देखील होत्या. सध्या त्या अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आहेत.

दरम्यान प्रदेश महिला अध्यक्षपदी निवड झाल्याने संध्या सव्वालाखे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माझी निवड म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेची प्रदेशाध्यक्षपदी निवड असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. महिला या सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून, महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांसाठी कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा प्रश्न निकाली निघाला असला तरीही काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही. दरम्यान, आता मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यास उत्सुक असल्याची माहिती आहे.

वडेट्टीवार यांची काँग्रेस सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांच्यासोबत दिल्लीत बैठक झाली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाबाबत विजय वडेट्टीवार आणि के सी वेणूगोपाल यांची राजधानीत खलबतं झाली.

महत्वाच्या बातम्या