संदीपच्या नव्या कवितांचा संग्रह-मी अन् माझा आवाज

टीम महारष्ट्र देशा : अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या पहिल्या चार कवितासंग्रहानंतर जवळपास पाच वर्षांनी कवी संदीप खरे ह्यांचा नवा काव्यसंग्रह “मी अन् माझा आवाज”भेटीस येत आहे. संदीपच्या लोकमान्य वैशिष्ट्यानुसार आयुष्यातील अनेक विषयांवरच्या कवितांचा अंतर्भाव ह्या कवितासंग्रहामध्ये आहे.कधी मिश्किल,कधी गंभीर,कधी आत्मचिंतनपर तर कधी आयुष्यमधील अत्यंत जवळच्या नात्यांचा घेतलेला वेध अशा वैविध्यपूर्ण कवितांचा समावेश मी अन् माझा आवाज ह्या कवितासंग्रहामध्ये आहे.

संदीप खरे ह्यांची “मी अन् माझा आवाज” ही कविता आशयामुळे आणि सादरीकरणातून रसिकांच्या मनात घर करून आहे.. अर्थातच नव्या कवितासंग्रहाचे शिर्षक असणारी ही कविता आपल्याला ह्या आगामी कवितासंग्रहा मधून वाचायला मिळणार आहे.

Loading...

अगदी थोड्या कवितांचा अपवाद वगळता उर्वरित अप्रकाशित कविता वाचकांसाठी नव्या ठरणार आहेत. मी अन् माझा आवाज चे मुखपृष्ठ आणि आतील कविता पुढे घेवून जाणारे संकल्पना चित्र जेष्ठ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी ह्यांनी केलेले अाहे.

रसिक साहित्य च्या रसिक आंतरभारती ही प्रकाशन संस्था मी अन् माझा आवाज हा संदीप खरे ह्यांचा कवितासंग्रह प्रकाशित करत आहे. अखिल भारतीय प्रकाशक संघाचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती चा पुरस्कार रसिक आंतरभारतीला नुकताच सन्मानित करण्यात आला असून,ह्या पूर्वी अभिनेते सुबोध भावे ह्यांचे घेई छंद हे अनुभवकथन करणारे, तसेच बाबा आमटे ह्यांची पुस्तके,ब्रॅंडिग जगत दाखविणारे अभिजित जोग ह्यांचे उपयुक्त असे ब्रॅंडनामा अशी रसिक ची पुस्तके रसिक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत.

मी अन् संदीप खरे ह्यांच्या आगामी कविता संग्रहाचे प्रकाशन रसिक तर्फे येत्या रविवारी २२ जुलै रोजी
हस्ते अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी अध्यक्ष गीतकार आणि झी २४ तास चे संपादक श्री विजय कुवळेकर आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे येथे दुपारी १ वाजता होत आहे. प्रकाशन समारंभानंतर गप्पा आणि कविता वाचन कार्यक्रम “मी अन् माझा आवाज” मध्ये संदीप खरें बरोबर अभिनेते जितेंद्र जोशी सहभागी होत आहेत.

सदर कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका रसिक साहित्य अप्पा बळवंत चौक,नावडिकर म्युझिक,आणि नाट्यगृहावर उपलब्ध अाहेत. रसिक वाचकांनी अवश्य आपली प्रवेशिका राखून ठेवावी असे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण करण्यात येत आहे.प्रकाशन पूर्व सवलतीत १३० रूपयांत नोंदणी २१ तारखेपर्यंत करण्यात येत असून असून www.rasiksahitya.com ह्या संकेतस्थळावरून देखील नोंदणी करता येवू शकत आहे. कवितासंग्रह मी अन् माझा आवाज
च्या आत्तापर्यंत ५०० हून अधिक प्रतींची नोंदणी सर्वत्र झालेली असून आपली प्रत आणि प्रकाशन समारंभाचे आसन राखून ठेवण्याचे अवाहन रसिक साहित्याचे संचालक शैलेश नांदुरकर ह्यांनी केले आहे.

भिडे वाडा होणार राष्ट्रीय स्मारक..!

नोकरभरतीत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण – मुख्यमंत्री

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'