सर्जिकल स्ट्राईक म्हणजे केंद्र सरकारची नौटंकी-कॉंग्रेस

Indian-Army-

टीम महाराष्ट्र देशा- काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी सर्जिकल स्ट्राईक म्हणजे केंद्र सरकारची नौटंकी आहे असे म्हणत टीका केली. सैन्य दलांची सुरक्षा अबाधित ठेवणे या सरकारला जमत नाही आणि सरकारकडून सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केला जातो आहे याला काहीही अर्थ नाही असेही दीक्षित यांनी ‘एएनआय’शी बोलताना स्पष्ट केले.दीक्षित यांनी भारतीय सैन्याच्या कामगिरीवर एकप्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे .दीक्षित यांनी उधळलेल्या मुक्ताफाळांमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत .

यापूर्वी देखील कॉंग्रेसकडून सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. उरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकारने सर्जिकल स्ट्राईक केला होता.या सर्जिकल स्ट्राईकनंतर काँग्रेसकडून टीका करण्यात आली होती. सरकारने या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे द्यावेत अशी मागणी त्यावेळी संजय निरुपम यांनी केली होती. तसेच इतर काँग्रेस नेत्यांनीही सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईचे पुरावे मागितले होते.

काय म्हणाले संदीप दीक्षित ?

पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी केंद्र सरकारने सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केला. त्यानंतर किती हल्ले कमी झाले? या सर्जिकल स्ट्राईकचा पाकिस्तानवर काय परिणाम झाला? केंद्राने पाकिस्तानच्या घुसखोरीवर आणि वाढत्या हल्ल्यांवर वेगळ्या उपाययोजना केल्या पाहिजेत. पुलवामात दहशतवाद्यांनी सीआरपीएफवर हल्ला चढवला. या हल्ल्यात भारताचे पाच जवान शहीद झाले. काश्मीर खोऱ्यातही हल्ले सुरु असतात. ज्यामध्ये देशाचे जवान मारले जातात. मग सर्जिकल स्ट्राईक हे एकच चोख प्रत्युत्तर आहे का? असा प्रश्न दीक्षित यांनी उपस्थित केला.