मनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली

Shivsena-vs-MNS

टीम महाराष्ट्र देशा : शोले, डॉन, जंजीर, अग्निपथ, हे 80-90 दशकातील सुपर हिट चित्रपट पण ह्यांचे रिमेक सुपर फ्लॉप झाले. मात्र, ह्या निष्कर्षाचा सध्या सुरू असलेल्या अयोध्या विषयाशी कोणीही संबंध जोडू नये. अस ट्विट करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान, शिवसेना भवनसमोर मनसेनं काही दिवसांपूर्वी पोस्टरबाजी केली होती. आयोध्यावारीसाठी शुभेच्छा देत उद्धव ठाकरेंना या पोस्टरद्वारे चिमटा काढण्यात आला होता. शिवसेनेच्या आयोध्या मुद्द्यांवर मनसेनं 10 प्रश्नही विचारले होते.

अयोध्यावारीमुळे राज्यातील रस्ते खड्डे मुक्त होतील का, राज्यातील महिला सुरक्षित होतील का? असे सवाल या पोस्टरद्वारे विचारण्यात आले होते.तर हे सवाल सर्वसामान्यांच्या मनातले असल्याचा मत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं होत, शिवाय मनसेच्या नेत्यांच्या राजीनाम्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. आता पुन्हा एकदा राम मंदिर मुद्यावरून मनसे – शिवसेना समोरासमोर उभे ठाकणार असल्याच चित्र आहे.