मुंबई: शिवसेनेशी बंड करणाऱ्या आमदारांना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चांगलेच सुनावले आहे. सेनेशी बंड करणरे मूळ सेनेचे नाहीच असे म्हणत त्यांनी प्रत्येक आमदाराचा इतिहासच समोर ठेवला. यावरूनच मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनीही संजय राऊतांची राजकीय कुंडलीचा दाखला देत टोला लगावला.
“दुसऱ्यांना रिक्षावाला, पान टपरी वाला ,भाजी विकणारा ,वॉचमन, म्हणण्याऱ्या लोकांनी हे विसरू नये ते स्वतः लोकप्रभा मध्ये कारकून होते तिथून उचलून राजसाहेबांनी तुम्हाला सामना चे संपादक बनवलं.”, असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
दुसऱ्यांना रिक्षावाला, पान टपरी वाला ,भाजी विकणारा ,वॉचमन, म्हणण्याऱ्या लोकांनी हे विसरू नये ते स्वतः लोकप्रभा मध्ये कारकून होते तिथून उचलून राजसाहेबांनी तुम्हाला सामना चे संपादक बनवलं
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 28, 2022
दरम्य कालच्या सामना अग्रलेखात संजय राऊत यांनी म्हटले होते कि, संदीपान भुमरे यांना मोरेश्वर सावे यांची उमेदवारी कापून तेव्हा पैठणची उमेदवारी दिली. शिवसैनिकांच्या मेहनतीने ते सतत विजयी झाले. आज ठाकरे सरकारात ते कॅबिनेट मंत्री झाले. पैठणच्या एका साखर कारखान्याच्या दारात वॉचमनची नोकरी करणारा हा माणूस शिवसेनेमुळे 30 वर्षे सत्तेत आहे व वेळ येताच पळून गेला. दादा भुसेपासून अनेक आमदार जे फक्त शिवसेनेमुळे आमदार व मंत्री झाले, ते फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होते. तेव्हा भाजपचा जाच होता व आज महाविकास आघाडीत आहेत तेव्हा त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा त्रास होतोय. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : “जहालत एक किस्म कि मौत…”, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत
- Aditya Thackeray : मुंबईत इमारत कोसळून मोठी दुर्घटना, आदित्य ठाकरेंनी घेतली घटनास्थळी धाव
- Sumit Khambekar : अजित पवार कोरोना पाॅझिटिव्ह; ‘मनसे’ने म्हटले, “मुख्यमंत्री साहेबांचा सल्ला घ्या कारण..”
- Mumbai : धक्कादायक! मुंबईत चार मजली इमारत कोसळली, २० ते २५ जण ढिगाऱ्याखाली अडकले
- Sanjay Raut : “…पण महाराष्ट्र हे पाप स्वीकारेल का?” ; संजय राऊतांचा बंडखोरांवर निशाणा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<