Share

MNS | “उद्धव ठाकरे यांच्या कडे मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही तो म्हणजे…”; मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटातील वादाला आत वेगळं वळण मिळालं आहे. त्याचबरोबर अंधेरी (पूर्व) मध्ये पोट निवडणुकीपर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोणालाच वापरता येणार नाहीय. आयोगाच्या निर्णयानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच मनसे पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संदीप देशपांडे ?

संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही म्हणणाऱ्यांचं नावही संपलं आणि चिन्हही. कालाय तस्मै नम:, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर आकाऊंटवरून ट्विट केलं आहे. हे ट्विट त्यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर काल रात्री केलं असल्याचं समजतं आहे.

पुढे एका ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे एक मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही. तो म्हणजे गरीब,भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे. त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे, ज्याला इंग्रजीमध्ये Victim Card असं म्हणतात. जे यापुढे सातत्याने बघायला मिळेल, असं म्हणत देशपांडे यांनी ठाकरेंना चांगलंच लक्ष्य केलं आहे.

तसेच, संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासमोर केलेल्या भाषणातील एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ‘वारसा वस्तूचा नसतो, विचारांचा असतो’ असं म्हटलं आहे.त्या व्हिडीओमध्ये ‘माझ्याकडे निशाणी असली काय नसली काय, नाव असलं काय नसलं काय. मला फरक पडत नाही. कारण माझ्याकडे विचार आहेत’, असं राज ठाकरे दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now