‘मंत्रिमंडळात लॉकडाउनवर चर्चा होते, तशी बेरोजगारी, बुडालेले उद्योगधंदे यावर चर्चा होते का ?’

उद्धव आणि राज ठाकरे

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासन अनेक उपाययोजना राबवत आहे. राज्यात लॉकडाऊन करण्यात आला असून आता जिल्हा पातळीवर पूर्ण लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे समोर येत आहे.

आज राज्य सरकारने लॉकडाउन संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सलग दुसऱ्यांदा लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. यापूर्वी १५ एप्रिल ते ३० एप्रिल त्यानंतर एक मे ते १५ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला. आता लॉकडाउनचा कालावधी ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातील कोरोना स्थिती हळूहळू नियंत्रणात येतेय. मुंबईत स्थिती मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आलीय. रुग्ण दुपटीचा कालावधीही १५० दिवसांपेक्षा जास्त आहे.

ठाकरे सरकारच्या या लॉकडाउन वाढवण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. मनसेचे नेते आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टि्वट करुन लॉकडाउन वाढवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सरकारकडे अनलॉकचा एक्झिट प्लान आहे का? नेमकी किती रुग्ण संख्या झाली की सरकार निर्बंध शिथिल करणार आहे? मंत्रिमंडळात लॉकडाउनवर चर्चा होते, तशी बेरोजगारी, बुडालेले उद्योगधंदे, वीजबिल,जनतेचे आर्थिक नुकसान, बँकांचे हप्ते यावर चर्चा होत असेल का? यावर ठोस उत्तर सरकार देईल का? असा सवाल मनसेने विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP