Share

Health Care | चंदनाच्या तेलाने शरीरातील ‘या’ समस्या होऊ शकतात दूर

Health Care | टीम महाराष्ट्र देशा: चंदनाचे तेल (Sandalwood Oil) आपल्या आरोग्यासाठी (Health) आणि शरीरासाठी खूप फायदेशीर असते. चंदनाच्या तेलाचे सेवन केल्याने शरीरातील अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी चंदनाचे तेल मोठ्या प्रमाणात वापरले जाते. पण त्वचेसोबतच चंदनाच्या तेलाच्या वापराने शरीराला देखील अनेक फायदे मिळू शकतात. चंदनाच्या तेलाच्या वापराने शरीराला पुढील फायदे मिळू शकतात.

रक्तदाब नियंत्रणात राहतो

चंदनाचे तेल रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. चंदनाच्या तेलाच्या सुगंधाने शरीरातील हार्मोन्स सक्रिय होऊन रक्ताभिसरण चांगले होते. परिणामी रक्तदाब नियंत्रणात राहतो. चंदनाच्या तेलाचा नियमित वापराने हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

झोपेच्या समस्या दूर होतात

तुम्हाला जर झोप न लागण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असेल, तर चंदनाचे तेल तुमच्यासाठी एक रामबाण उपाय ठरू शकते. चंदनाच्या तेलाने मसाज केल्याने तुम्हाला सहज झोप लागू शकते. त्याचबरोबर चंदनाच्या तेलाने मसाज केल्याने शरीराला आराम मिळून तणाव कमी होतो. परिणामी तुम्हाला झोप चांगली लागते.

त्वचेसाठी उपयुक्त

सौंदर्य उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात चंदनाचे तेल वापरले जाते. कारण त्वचेवरील अनेक समस्यांवर मात करण्यासाठी चंदनाचे तेल उपयुक्त आहे. चंदनाच्या तेलाच्या सेवनाने त्वचेवरील रंग सुधारू शकतो. त्याचबरोबर चंदनाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज केल्यास चेहऱ्यावरील चमक वाढू शकते.

शरीरावरील सूज कमी होते

चंदनाच्या तेलाच्या नियमित वापराने शरीरावरील अतिरिक्त सूज कमी होऊ शकते. कारण यामध्ये अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्म आढळतात.  जे सूज कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर चंदनाच्या तेलाच्या नियमित वापराने शरीरावरील लालसरपणा देखील कमी होतो. या तेलाचा वापर आणि शरीर दीर्घकाळ निरोगी राहू शकते.

तुम्हाला चंदनाच्या तेलाची किंवा चंदनाच्या कुठल्याही उत्पादनाची एलर्जी आहे की नाही, हे डॉक्टरांकडून तपासून मगच त्या तेलाचा वापर करा.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Health Care | टीम महाराष्ट्र देशा: चंदनाचे तेल (Sandalwood Oil) आपल्या आरोग्यासाठी (Health) आणि शरीरासाठी खूप फायदेशीर असते. चंदनाच्या तेलाचे …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now