आम्ही माफिया नाही व्यावसायिक आहोत : भाऊसाहेब आंधळकर

औरंगाबाद– राज्य वाळू वाहतूक संघर्ष समितीच्या वतीने पोलिसांच्या हफ्तेखोरी विरोधात औरंगाबाद येथील क्रांती चौकातून मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र कायदा व सुव्यस्थेचे कारण पुढे करत पोलिसांनी ऐनवेळी आंदोलनाला दिलेली परवानगी रद्द केली.

यावेळी बोलताना संघर्ष समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब आंधळकर म्हणाले की ‘आम्ही माफिया नाही व्यावसायिक आहोत, आम्हाला सन्मानाने जगू द्या, वाळू माफिया आणि वाहतूकदार यांच्यातील फरक प्रशासनाने समजून घ्यायला हवा. जरी पोलिसांनी परवानगी दिलेली नसली तरी पुढच्या वेळेस शासनाकडून परवानगी मिळवून आंदोलन करणारच असल्याचेही त्यांनी सांगितले. या तर  संबंधी मुख्यमंत्र्यांना देखील आपण बोलणार असल्याची माहिती यावेळी आंधळकर यांनी दिली.

आंदोलनावेळी वाळू वाहतुकदारांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पोलीसांकडून केली जाणारी कारवाई थांबविण्याची मागणी केली. दरम्यान मोर्चाला ऐनवेळी परवानगी नाकारल्याने भाऊसाहेब आंधळकर यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन आयुक्तांना निवेदन दिले आहे.