उपनिरीक्षकालाच लाच देणारा वाळू ठेकेदार अटकेत

औरंगाबाद : वाळूचे अवैद्य दोन टेम्पो चालवू देण्यासाठी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कार्यरत उपनिरीक्षकाला इच्छा नसताना २५ हजारांची लाच देणाऱ्या वाळू ठेकेदाराला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी दुपारी साडे चारच्या सुमारास करण्यात आली. गोकुळ बाळासाहेब सूर्यवंशी (४०, रा.बळेगाव, ता.वैजापूर) असे अटकेतील वाळू ठेकेदाराचे नाव आहे.

पोलीस उपनिरीक्षक शैलेश उद्धवराव जोगदंड हे देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. गोकुळ सूर्यवंशी हा वाळूची ठेकेदारी करतो. त्याने त्याचे दोन टेम्पो सुरू करण्यासाठी उपनिरीक्षक जोगदंड यांना इच्छा नसताना एका टेम्पोचा हप्ता म्हणून २५ हजारांची लाच देऊ केली. मात्र, जोगदंड यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी सापळा लावून सूर्यवंशी याला रंगेहात पकडले.

औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात एकीकडे देवगाव रंगारी येथे कार्यरत असलेले पोउपनिरीक्षक शैलेश जोगदंड याने लाच देणाऱ्याला एसीबी च्या हवाली केले तर दुसरीकडे पिशोर पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत असलेले रणजित गंगाधर कासले यांनी तक्रारदाराकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या