fbpx

आधिवेशनात महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करा – सुप्रिया सुळे

टीम महारष्ट्र देशा – आज पासून सुरु झालेल्या संसदेच्या आधिवेशनात महिला आरक्षणाचे विधेयक आणून त्यावर चर्चा करुन ते मंजूर करावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीस उपस्थित राहुन सुळे यांनी हो मागणी केली आहे.

महिला आरक्षणाचे विधेयक संसदेत मंजूर झाल्यास महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली काल सर्वपक्षीय बैठक पार पडली.

यावेळी सुळे यांनी शेतकऱ्यांसमोरील संकटांबाबत प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. याशिवाय बेरोजगारी दूर करण्याबाबतही तरतूद करावी असे सुचविले आहे.