सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांना अटक करा : जितेंद्र आव्हाड

Jitendra-Awhad

टीम महाराष्ट्र देशा : हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित वैभव राऊत कडून मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त केल्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने पुण्यातून काल संध्याकाळी दोघांना अटक केली होती. या प्रकरणाची व्याप्ती आज वाढली असून सकाळी केलेल्या कारवाईत पुण्यातून आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर राज्यभरातून एकूण 12 जणांना एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

नक्षलवाद्यांचा वकील म्हणून गडलिंगना अटक होते तर सनातनचे वकील पुनाळेकर जे बॉम्बस्फोटातल्या आरोपींच खूलेआम समर्थन करतात त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस)ही कारवाई करत, राज्यात सणासुदीच्या दिवसात घातपात घडवून आणण्याचा मोठा कट उधळून लावला. कालच्या कारवाईमध्ये वैभव राऊत, शरद कळसकर व सुधन्वा गोंधळेकर या हिंदुत्वावादी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर गोरक्षकांचा अडथळा दूर करण्यासाठी वैभव राऊतवर कारवाई करण्यात येत असून स्फोटकप्रकरणी अटक केलेल्या वैभव राऊतला कायदेशीर मदत पुरवणार असल्याची घोषणा सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केली होती.

पालघर बॉम्ब साठा प्रकरण; शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संशयाच्या भोवऱ्यात