fbpx

पुण्यात सनबर्न फेस्टिवलला सनातनचा विरोध

पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या सनबर्न फेस्टिवलला सनातन संस्थेने विरोध केला आहे. सनबर्नकडून कर चुकवला जात नसल्याची आणि सनबर्न फेस्टिवलमध्ये अंमली पदार्थांचे सेवन होते असा आरोप सनातन संस्थेकडून करण्यात आला आहे. पुण्यातील केसनंदमध्ये २८ डिसेंबरपासून सनबर्न फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार आहे. सनातन संस्थेने सनबर्नला विरोध केला असला तरी राज्याच्या पर्यटन विभागाने या फेस्टिवलला पाठिंबा दिला आहे.

‘संतांच्या भूमीत नंगानाच होऊ देणार नाही,’ अशी भूमिका सनातन संस्थेने घेतली आहे. यासाठी सनातन संस्थेकडून एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‘याआधी गोव्यात सनबर्न फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एका तरुणीचा अंमली पदार्थाच्या सेवनाने मृत्यू झाला होता. मात्र त्यावेळी सनबर्न फेस्टिवलच्या आयोजकांनी जबाबदारी घेतली नव्हती. त्यामुळे या फेस्टिवलचे आयोजित करताना यामधील कोणत्याही अनुचित प्रकारासाठी आयोजकच जबाबदार असतील, असा लेखी कबूलनामा घ्यावा असे सनातन संस्थेने पत्रकार परिषदेत म्हटले आहे.