अटक होण्याची भीती वाटत असणाऱ्या साधकांना सनातनचा अजब सल्ला

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या आरोपात अटक करण्यात आलेले सचिन अंदुरे, शरद कळसकर यांचा देखील सनातन आणि कट्टर हिंदुत्ववादी संघटनेशी सबंध असल्याचे समोर आले आहे. विचारवंतांच्या हत्या घडवून आणल्याप्रकरणी सनातनच्या अनेक साधकांची नावे समोर येवू लागली आहेत. अटक होण्याची भीती वाटत असणाऱ्या साधकांना अटक टाळण्यासाठी सनातनने अजब सल्ला दिला आहे. हा अजब सल्ला सोशल मिडीयावर चर्चिला जात असून सनातनला मोठ्याप्रमाणावर ट्रोल करण्यात येत आहे.

साधकांना सनातनने दिलेला सल्ला

निरपराध हिंदूंच्या लागोपाठ चालू असलेल्या अटकसत्रामुळे काही हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि साधक यांच्यामध्ये ‘अशाच प्रकारे चुकीची अटक माझीही होऊ शकते’, अशी नाहक भीती वाटत असल्यास साधकांनी नामजप आणि प्रार्थना यांचे प्रमाण वाढवावे, असा उपदेश सनातन प्रभात या मुखपत्रातून करण्यात आला आहे.

नामजप कसा करावा याची पद्धत देखील या वृत्तपत्रात दिली आहे. नामजप करताना कुलदेवता किंवा भगवान श्रीकृष्ण यापैकी अधिक श्रद्धा असलेल्या कोणत्याही एका देवतेचा किंवा दोन्ही देवतांचे जप करण्याची इच्छा असल्यास अर्धा-अर्धा वेळ विभागून नामजप करावेत. नामजपासमवेत मनातील विचार किंवा भीती यानुसार अधूनमधून प्रार्थनाही करावी. या व्यतिरिक्त अन्य कोणती उपासना करत असल्यास ती करावी.

निलेश लंके राष्ट्रवादीच्या वाटेवर ? अजित पवारांची घेतली भेट

 

You might also like
Comments
Loading...