सांगलीच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

सांगली: पुणे येथील बालेवाडी मैदानात रविवार दि.7 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत कोल्हापुर जिल्हा संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर सांगली जिल्हयातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. सांगलीच्या किर्तीकुमार धस या खेळाडूला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान तर साताराच्या मयुरी जगदाळेला सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा सन्मान मिळाला. या स्पर्धेत पुणे विभागातील सांगली, सातारा, कोल्हापुर, सोलापूर आणि पुणे जिल्हयातील महसूल कर्मचारी आणि अधिकारी खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री गिरिश बापट यांच्याहस्ते झाले. या स्पर्धेत कोल्हापुर जिल्हा संघाने व्हॉलीबॉल, फुटबॉल, महिला खो-खो या सांघिक खेळात प्रथम क्रमांक पटकावला . तसेच पोहणे, रिले यासह वैयक्तिक खेळात पदक पटकावली. कोल्हापुर जिल्हा संघाला स्पर्धेतील सर्वसाधारण विजेतेपद मिळाले.

सांगली जिल्हयातील खेळाडूंनी देखील चमकदार कामगिरी केली. सांगली येथील किर्तीकुमार धस या खेळाडूंने भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक – प्रथम क्रमांक, उंचउडी- द्वितीय क्रमांक पटकावला.स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा बहुमान किर्तीकुमार यांने पटकावला. वैयक्तिक खेळात विट्याच्या संजय जाधव लांबउडी- प्रथम, साधना गायकवाड- बुध्दीबळ प्रथम, गोपीका मांजरेकर – 3 किमी चालणे, रिंगटेनिस एकेरी प्रथम, लांबउडी द्वितीय, साधना गायकवाड- बुध्दीबळ यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.सांघिक खेळात खो-खो, कबड्डी स्पर्धेत सांगली जिल्हयाने प्रथम क्रमांक पटकावला.

तसेच फुटबॉल स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. सातारच्या मयुरी जगदाळे या खेळाडूंने शंभर मिटर, दोनशे मिटर, रिले या खेळप्रकारात यश मिळवले. मयुरी जगदाळे हिची स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून निवड झाली. सांस्कृतिक विभागात पुणे, कोल्हापुर आणि सोलापूर जिल्हयाने अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत आणि विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याहस्ते बक्षीस देण्यात आले.