३० जुलैला येणार सॅमसंगचा ‘हा’ जबरदस्त फोन

samsung phone

नवी दिल्ली : दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे. सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन Galaxy M31s हा असून तो ३० जुलैला लाँच होत आहे. हा फोन गुगल प्ले कन्सोल लिस्टिंगमध्ये नजर आला आहे. यावरून या फोनचे फीचर्स आले आहेत. या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि 6,000mAh बॅटरी देण्यात आली असून कंपनीने Exynos 9611 प्रोसेसर आणि फास्ट चार्जिंगसाठी 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

MySmartPrice च्या रिपोर्टनुसार, या फोनमध्ये 1,080*2,400 पिक्सल रेजॉलूशनचा डिस्प्ले मिळणार आहे. हा सुपर एमोलेड फुलHD+ डिस्प्ले असणार आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम मिळणार आहे. हा फोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे. तसेच फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाणार आहे. फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा आणि पंच होल सेल्फी कॅमेरा दिला जाणार आहे. आणि फोनमध्ये 6,000mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली जाणार आहे.

या फोनमध्ये ६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज ऑप्शनसोबत हा येणार आहे. या सीरीजचा जुना फोन Galaxy M31 ला कंपनीने १५ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले होते. तर आता सॅमसंग गॅलेक्सी M31s ची भारतात जवळपास २० हजार रुपये असू शकते.

अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांना लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता!

4000 एमएएच बॅटरीच्या रेडमी 7 ए वर मोठी सूट, पहा किंमत