सॅमसंगचा नवा फ्लिप स्मार्टफोन लाँच

सॅमसंगनं आपला नवा फ्लिप स्मार्टफोन SM-G9298 लाँच केला आहे. दरम्यान, कंपनीने अद्याप या फोनच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. यामध्ये 2 स्क्रीन देण्यात आल्या आहेत. फोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट आहे. 4.2 इंच ड्यूल स्क्रिन असून त्याचे रेझ्युलेशन 1080×1920 पिक्सल आहे. स्नॅपड्रॅगन 821 चिपसेट प्रोसेसर देण्यात आले आहे. तसेच यात 4 जीबी रॅमही देण्यात आली आहे.
यामध्ये 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा तर 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली असून 256 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये 2300 mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये 4जी, ब्ल्यूटूथ, जीपीएस, यासारखे कनेक्टिव्हिटीचे ऑप्शनही देण्यात आले आहेत.

You might also like
Comments
Loading...