मधुकर उचाळे यांना सम्राट चंद्रगुप्त फाऊंडेशनचा राजकीय क्षेत्रातील पुरस्कार जाहीर

अहमदनगर :  येथील सम्राट चंद्रगुप्त फाऊंडेशनचे पुरस्कार जाहिर झाले असुन, विविध क्षेत्रातील 13 मान्यवरांच्या नावाची घोषणा प्रतिष्ठानचे सचिव डी.आर.शेंडगे यांनी केली आहे. आज सायं.5 वाजता प्रोफेसर कॉलनी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे माजी मंत्री आण्णसाहेब डांगे व माजी मंत्री अनिल राठोड यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमास महापौर सुरेखा कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष शालीनाताई विखे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पुरस्करांर्थीचे नावे पुढील प्रमाणे- उद्योगभुषण – उत्तम सरगर (उत्तम इलेक्ट्रीकल, अ.नगर) सहकार भुषण -कडूभाऊ काळे (संत नागेबाबा मल्टीस्टेट), राजकिय- मधुकर उचाळे (मा.जि.प.सदस्य), पत्रकारिता- राजेंद्र झोंड (निवासी संपादक, पुण्यनगरी) राजु खरपुडे (प्रेस फोटोग्राफर), कुणाल जायकर (टी.व्ही.9), साहित्यभुषण – डॉ.कमर सुरुर (ख्यातमान उर्दू कवि), वैद्यकिय – डॉ.सुशिल नेमाने (वैद्यकिय अधिकारी), क्रिडा- संभाजी भाईक (भाईक आय.पी.एल.चे प्रणते) अंगणवाडी सेविका – सरस्वती भोंडवे (भोंडवेवाडी, ढवळपूरी), शिक्षण- राधाकृष्ण पवार (शिक्षणसंस्था, वडगाव आमली), महिला सक्षमीकरण – सौ. मेघना टेपाळे ( महिला बचतगट, बँकींग क्षेत्रात विशेष योगदान), अलका कदम (महिल बचत गट,भाळवणी) आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.

पुरस्कारार्थींची निवड समितीचे डॉ.राहुल कडूस, दिपक पाटील, प्रा.विष्णु बारगळ, रेणुकादास ठोंबरे, गणेश भोर, पै.मच्छिंद्र वामन, प्रा. चंद्रकांत वाव्हळ, अमोल काळे, आदिनाथ बर्डे, गुंजाळ, चितळकर आदींच्या समितीने केली आहे तरी या कार्यक्रमास सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.