विकास गांडो थयो छे; ‘सामना’तून यशवंत सिन्हांना पाठींबा

samna on yashwant sinha

माजी अर्थमंत्री तथा भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी काल मोदी सरकारला दिलेल्या घरच्या आहेरामुळे भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तर आता सिन्हा यांच्या विधानाचे समर्थन करत सामनामधून टीका करण्यात आली आहे. ‘‘मी गरिबी अतिशय जवळून अनुभवली आहे,’ असे पंतप्रधान अनेकदा सांगतात. जनतेने याच गरिबीचा अनुभव घ्यावा यासाठी पंतप्रधानांचे अर्थमंत्री मेहनत घेत असल्याच यशवंत सिन्हा यांनी सांगितल होत. ”यावर आम्हाला काहीच म्हणायचे नाही. हे सर्व आम्ही वर्षभरापूर्वीच सांगितले होते. तेव्हा आम्ही देशद्रोही ठरलो होतो आता यशवंत सिन्हा ठरतील”असे म्हणत सामनातून मोदी आणि भाजपवर निशाना साधण्यात आला आहे.

काय म्हटलय सामानाच्या अग्रलेखात
गुजरातच्या विकासाचे काय झाले? असा सवाल करताच ‘विकास गांडो थयो छे!’ म्हणजे ‘विकास वेडा झाला आहे,’ असे उत्तर आता गुजराती जनता देत आहे. फक्त गुजरातच कशाला, संपूर्ण देशभरातच ‘विकास गांडो थयो छे’ म्हणजे विकास वेडा झाल्याचे चित्र भारतीय जनता पक्षाचेच वरिष्ठ मंडळ समोर आणीत आहे. ‘‘विकासाबाबत काहींनी पुष्कळ थापा मारल्याने विकास वेडा झाला असावा,’’ अशी शहाणपणाची टिप्पणी राहुल गांधी यांनी केली आहे. ई.व्ही.एम. मशीनमध्ये घोटाळे करून व पैशांचा वापर करून निवडणुका जिंकल्या म्हणजे विकास झाला असे काहींना वाटत आहे, पण विकासाची अवस्था बिकट झाली आहे.

मनमोहन सिंग, चिदंबरम अशा ‘अर्थतज्ञां’नी कालपर्यंत हेच सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा मनमोहन सिंग व चिदंबरम हेच ‘गांडो थयो छे’ असे सांगण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता अर्थमंत्री पदावर प्रदीर्घ काळ राहिलेले हे लोक मूर्ख व आपण तेवढे शहाणे या भ्रमाचा भोपळा यशवंत सिन्हा या भाजपच्याच माजी अर्थमंत्र्यांनी फोडला आहे. देशाचा विकास दर हा ५.७ टक्के असल्याचे सांगितले जाते. तो प्रत्यक्षात ३.७ टक्केच असल्याचे बिंग फोडल्याबद्दल यशवंत सिन्हा हे