विजय वेडा झाला असून लोकांनी त्याला चोपलंय; निवडणूक जिंकल्याचा भाजपचा दावा फोल

udhav thackeray on bjp

टीम महाराष्ट्र देशा: राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत आपल्याला घवघवीत यश मिळाल असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. मात्र, लोकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत कमळाबाईस ‘तलाक’ दिला आहे. भाजपने आकड्यांचा खेळ कितीही करू द्यात, सत्य वेगळेच असल्याच म्हणत सामनामधून भाजपवर खरमरीत टीका करण्यात आली आहे. तसेच पराभवाच्या मानेवर पाय ठेवून विजयाच्या किंकाळ्या मारता येणार नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीत विजय वेडा झाला असून लोकांनी त्याला चोपलंय असा खोचक टोला देखील लगावण्यात आला आहे.

Loading...

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल संमिश्र लागले आहे. ग्रामपंचायत आपल्या हाती राहाव्यात म्हणून सत्ताधारी भाजपने ‘थेट’ निवडणुकांचा घेण्याची खेळी खेळली. पण वजिरांना फार महत्त्व न देता हत्ती, घोडे, उंट व शिपायांनीही अनेक ठिकाणी फत्ते केल्याचे चित्र आहे. हे हत्ती, घोडे, उंटही आमचीच सावत्र मुले व त्यांचे पाळणे कमळाबाईनेच हलवले, असा दावा कुणी करणार असतील तर त्याला काय करायचे? असा सवाल शिवसेनेकडून करण्यात आला आहे. तर निवडणुकीत ‘दाम’ महत्वाचा असून व ते भाजपकडे भरपूर असल्यानेच त्यांना थेट निवडणूक फायदेशीर ठरत असल्याचा गंभीर आरोपही अग्रलेखातून करण्यात आला आहे.

 Loading…


Loading…

Loading...