समीर वानखेडेंच्या जीवाला धोका; केंद्राकडून झेड प्लस सुरक्षा

समीर वानखेडेंच्या जीवाला धोका; केंद्राकडून झेड प्लस सुरक्षा

मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी क्रुझ पार्टीवर छापा टाकला आणि या कारवाईध्ये त्यांनी शाहरुख खानच्या मुलाला अटक केली. तेव्हापासून समीर वानखेडे हे चांगलेच चर्चेत आहेत. राज्याचे कॅबिनेटमंत्री नवाब मलिकांना यांनी थेट जाहीर सभेतून समीर वानखेडे लवकरच तुरुंगात जातील, असे म्हटले. त्यानंतर, वानखेडे आणि मलिक यांच्यातील शाब्दीक संघर्ष टोकाला पोहोचला आहे.

या सर्व प्रकरणामध्ये वानखेडे कुटुंबातील सदस्यांनी आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं वानखेडेंची पत्नी प्रसिद्ध मराठी अभनेत्री क्रांती रेडकर यांनी म्हंटल आहे. तर, समीर वानखेडे यांच्या जीवाला धोका असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे, केंद्रीय गृहमंत्रालयाने समीर वानखेडे यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

समीर यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येईल. मुंबईत कॉर्टेलिया क्रूजवर २ ऑक्टोबर रोजी त्यांनी केलेल्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान,  क्रुझवर उपस्थित असणाऱ्या बड्या ड्रग्ज माफियाला समीर वानखेडे यांनी सोडून दिलं असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक हे सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे, वानखेडे कुटुंबातील सदस्यही आता मैदानात उतरले असून पत्नी क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांना इशाराच दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या