समीर गायकवाड ला जामीन मंजूर

कॉ.गोविंद पानसरे हत्या प्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाडला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे.जिल्हा सत्र न्यायाधीश एल.डी. बिले यांनी केला जामीन मंजूर केला. समीरचे वकील समीर पटवर्धन आणि विरेंद्र इचलकरंजीकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत त्याला जामीन देण्यात आला आहे.
कोर्टाने कोणत्या प्रमुख अटी घातल्या आहेत टाकूयात एक नजर-
1)महाराष्ट्र सोडायचं नाही
२)पासपोर्ट कोर्टाच्या ताब्यात देणं
३)कोल्हापूर जिल्हा बंदी
४)दर रविवारी तपास यंत्रणेकडे हजेरी लावणे
5)जिथं राहणार आहे, त्याचा पत्ता कोर्टाला सादर करणे