.. अखेर समीर भुजबळ तुरुगांतून बाहेर; कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

sameer_bhujbal

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ अखेर सव्वा दोन वर्षांनी कारागृहाबाहेर आले. दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामातील कथित घोटाळा आणि कंत्राटांच्या बदल्यात काळ्या पैशांची कमाई केल्याच्या आरोपाखाली समीर भुजबळ अटकेत होते. आर्थर रोड जेलमधून बाहेर पडल्यावर कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत केलं.

बुधवारी मुंबई हायकोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला. 5 लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.महाराष्ट्र सोडून जाता येणार नाही आणि सुनावणीवेळी कोर्टात हजर राहावं लागेल या अटीवर कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर झालाय. अखेर काल त्यांची कारागृहातून मुक्तता झाली.