fbpx

…हे खरंच पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? भाजप प्रवक्त्याचा पलटवार

bjp-lotus

टीम महाराष्ट्र देशा : सध्या देशातील सर्वच क्षेत्रातून पूरग्रस्त केरळला मदत करून त्यांना सावरण्यासाठी सरसावत आहेत. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जर्मनीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात व्यस्त आहेत. एवढच नाही तर जर्मनीतील हॅम्बर्ग येथील बूसेरियस समर स्कूलच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयांवर टीका केली. या निर्णयांमुळे छोटे व्यापारी, असंघटीत कामगार यांच्यावर मोठं संकट कोसळलं आहे. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असल्याचं ही कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यावेळी बोलले.

तसेच २१ व्या शतकात जर तुम्ही कोणाला योग्य संधी दिली नाही किंवा व्हिजन दिलं नाही तर दुसरीकडून त्याला व्हिजन मिळेल. हे बोलताना त्यांनी इसिसचं उदाहरण दिलं. ते म्हणाले की, अमेरिकेने जेव्हा कायद्याच्या आधारावर इराकच्या एका समाजाला सरकारी नोकरीतून काढून टाकलं, तेव्हा त्यांनी दहशतवादी संघटना (इसिस) उभी केली. अशाच धोरणांमुळे आज इराक आणि सिरियात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

राहुल गांधी यांच्या या भाषणाला भाजपकडून ट्विटरवरून उत्तर देण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी इसिसच्या निर्मितीचं उदाहरण देताना दिलेले कारण भयंकर आहे आणि मोदींनी जर हिंदुस्थानला व्हिजन दिले नाही तर दुसरे कोणीतरी (म्हणजे इसिस) व्हिजन देईल असं म्हटलं आहे. हे अविश्वनियच आहे.. हे खरंच पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का?, असं म्हणत भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधींना प्रतिउत्तर दिल आहे.

ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार कुलदीप नय्यर काळाच्या पडद्याआड