‘राज ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरेंचे नातू आहेत की बाबासाहेब पुरंदरेंचे’ संभाजी ब्रिगेडचा पुन्हा हल्लाबोल

raj thackeray - purandare

सोलापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या ९९ व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला पुण्यात हजेरी लावली होती. याचदरम्यान त्यांनी जाती व्यवस्थेवरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी राज ठाकरे यांना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, ते पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करत आहेत. असा आरोप करत राज ठाकरेंवर तोफ डागली होती.

आता हा वाद अजूनच चिघळण्याचे चिन्ह दिसत आहेत. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते हर्षल बागल यांनी देखील राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्याकडून केला जात आहे. राज ठाकरे हे बाबासाहेब पुरंदरे यांचे नातू आहेत की प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू आहेत? असा सवाल संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते हर्षल बागल यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे संभाजी बिग्रेड विरुद्ध मनसे आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

‘महाराष्ट्राचे सामाजिक सांस्कृतिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी नागपूर आणि गुजरातमधून राज ठाकरे यांना पुढे केलं जात आहे. आगामी निवडणुकीत युती करण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडून हा प्रयत्न केला जात आहे. पण राज ठाकरे यांनी ठरवलं पाहिजे की इतिहासावर बोलत असताना आपण अभ्यास करून बोललं पाहिजे. आपण बाबासाहेब पुरंदरे यांचे नातू आहेत की प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे नातू आहेत?’ असा सवाल देखील संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते हर्षल बागल यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या