…त्या दिवशी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी बोलायचं; संभाजीराजेंचा हुंकार

sambhajiraje

कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले आहेत. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली होती.

दरम्यान, संभाजीराजेंनी आज मराठा आरक्षणासाठीच्या मोर्चाची दिशा ठरवण्यासाठी मराठा समाज समन्वयकांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती देखील दिली. या मोर्चाची टॅगलाईन ‘आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय’ अशी असेल.

आता समाज बोलणार नाही, तर आता आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील असं म्हणत त्यांनी मूक मोर्चा आयोजित केला आहे. त्यादिवशी लोकप्रतिनिधींना बोलावं लागेल. मी काय जबाबदारी घेणार हे त्यांना सांगावं लागेल, असं देखील संभाजीराजे म्हणाले. यासोबतच, ‘आता भूमिका आक्रमक असेल पण टेक्निकल असेल. 36 जिल्ह्यात आंदोलन करूनही सरकारने दखल घेतली नाही तर काय करायचं, आपण बांगड्या भरल्या आहेत का? दखल घेतली नाही तर एकदाच जोर लावायचा. पुण्यापासून मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढायचा. पण ही वेळ आमच्यावर येऊ देऊ नका,’ असा इशारा संभाजीराजेंनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या