Sambhajiraje Chhatrapati | कोल्हापूर : भाजपचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचं प्रसाद लाड (Prasad Lad) म्हणालेत. प्रसाद लाड यांच्या या विधानानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी देखील लाड यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “प्रसाद लाड यांचे विधान मी नुकतेच ऐकले. शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असे ते म्हणत आहेत. हे दुर्दैव आहे. त्यांचा अभ्यास अपूर्ण आहे.” प्रसाद लाड हे जबाबदार व्यक्तिमत्त्व आहेत. ते आमदार आहेत. मात्र शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचे ते म्हणत आहेत. ही शरमेची बाब असल्याचं संभाजीराजे म्हणालेत.
“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे. लाड यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. ते जमत नसेल तर त्यांना महाराष्ट्रातून काढून टाकले पाहिजे, असे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) म्हणाले आहेत.
इकडे शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे. ते आमची अस्मिता आहेत, असे लाड म्हणतात. तर दुसरीकडे शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असा दावा करतात. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे. नुसती माफी मागी मागून चालणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालावे. देवेंद्र फडणवीस अभ्यासू आहेत,” अशी मागणी करत संभाजीराजे छत्रपती यांनी लाड यांना सुनावलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Arvind Sawant | “कोश्यारी ते प्रसाद लाड सगळ्यांना हाकलून द्या”; अरविंद सावंत यांची संतप्त प्रतिक्रिया
- Gulabrao Patil | “मंत्रिपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अवमान केल्यास…”; गुलाबराव पाटील यांचा इशारा काय?
- Amol Kolhe | “प्रसाद लाड काय ते तुमचे अगाध ज्ञान! चौथीच्या विद्यार्थ्यांकडून…”; अमोल कोल्हे यांचा खोचक सल्ला
- Prasad Lad | शिवरायांवरील विधानानंतर प्रसाद लाड यांनी व्यक्त केली दिलगिरी; म्हणाले,
- Sanjay Raut | “भाजपाचं डोकं फिरलंय, शिवरायांची भवानी तलवारच एक दिवस…”; ‘त्या’ प्रकरणावरून संजय राऊत संतापले