अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतही संभाजीनगरचा नारा; शहराला निधी देण्याचीही केली मागणी

औरंगाबाद : शहराचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या मुद्यावरून औरंगाबादमध्ये सर्व पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मधल्या काळात हा विषय थोडा मागे पडला असला तरी, विधान परिषदेत आमदार अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा संभाजीनगरचा नारा दिला आहे. इतकेच नाही तर, शहरातील विविध विकास कामांमध्ये राज्य सरकारने निधी दिला नसल्याने ती कामे रखडली आहेत. ती कामे मार्गी लावण्याची मागणीही दानवे यांनी विधान परिषदेत केली आहे.

औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्दा दानवे यांनी विधान परिषदेत मांडला. त्याच बरोबर औरंगाबादच्या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकारच्या वाटेचा निधी देण्याची मागणी त्यांनी केली. रेल्वे रुळाखालील भूयारी मार्ग आणि रेल्वे रुळावरील पूल यासाठीही राज्य सरकारच्या वाट्याचा निधी देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केलीय.

दर वेळी औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीच्या आधी संभाजीनगरचा मुद्दा चर्चात असतो. यात शिवसेना आणि भाजप यांचा कायमच पुढाकार असतो. यंदा मात्र, हा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलाच उचलला आहे. मनसे जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे या प्रकरणावर आक्रमक झालेले दिसून आले होते. त्यात आता अधिवेशनात दानवे यांनी विरोधकांना चपराक देत स्वत:च हा मुद्दा उपस्थित केलाय.

महत्त्वाच्या बातम्या