fbpx

पुरंदरमध्ये ‘जायंट किलर’ ठरू शकतात संभाजी झेंडे

टीम महाराष्ट्र देशा- विधानसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. विखे पाटील यांच्या बहिणीचे पती निवृत्त आयएएस अधिकारी संभाजी झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

संभाजी झेंडे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना आव्हान देणार असल्याची चर्चा आहे. झेंडे यांची विधानसभा तयारी आता पासूनच सुरूदेखील झाली असल्याची माहिती समोर आली आहे. झेंडे पुरंदरमध्ये ‘जायंट किलर’ ठरू शकतात अशी देखील शक्यता निर्माण झाली आहे.

कोण आहेत संभाजी झेंडे?

  • शेतकरी कुटुंबात 17 एप्रिल 1957 रोजी संभाजी झेंडे यांचा जन्म झाला.दिवे हे झेंडे कुटुंबाचं मूळ गाव .
  • शालेय शिक्षण दिवे गावातच झालं, त्यानंतर त्यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालयातून पदवी मिळवली.
  • MSC अॅग्री, LLB अशा पदव्या त्यांनी प्राप्त केल्या.
  • 1980 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षेत पास होऊन, प्रशासकीय सेवेत रुजू झाले.
  • 1993 मध्ये ते पदोन्नतीने आयएएस झाले.त्यांनी शासनाच्या विविध विभागात उल्लेखनीय काम केलं.
  • झेंडे हे 37 वर्षांच्या प्रशासकीय सेवेनंतर ते 30 एप्रिल 2017 मध्ये निवृत्त झाले

1 Comment

Click here to post a comment