विखे पाटलांच्या मेहुण्यांनाच राष्ट्रवादीने फोडलं,पवारांच्या धूर्त खेळीने सारेच आवाक

blank

टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. विखे पाटील यांच्या बहिणीचे पती निवृत्त आयएएस अधिकारी संभाजी झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ते आज पक्षात प्रवेश करतील.

एकीकडे शरद पवार – विखे कुटुंबाचा राजकीय संघर्ष सर्वज्ञात असताना, राधाकृष्ण विखेंच्या मेहुण्यांनाच राष्ट्रवादीने फोडल्याने हा संघर्ष वाढण्याची चिन्हं आहेत.संभाजी झेंडे यांनी निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडलं आहे.

विजय शिवतारेंना देणार आव्हान

राष्ट्रवादीत आज प्रवेश करणार असलेले संभाजी झेंडे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना आव्हान देणार असल्याची चर्चा आहे. कारण पुरंदर विधानसभा मतदारसंघातून शिवतारे यांच्याविरोधात झेंडे हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. झेंडे यांची विधानसभा तयारी आता पासूनच सुरूदेखील झाली असल्याची माहिती समोर आली आहे.