fbpx

… अन् अमित शहा यांच्या दौ-याने संभाजीरावांना मिळाले हत्तीचे बळ !

निलंगा/प्रा.प्रदीप मुरमे : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नुकत्याच झालेल्या लातूर दौ-यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पसरला असून संपूर्ण जिल्हा भाजपमय झाला आहे.परिणामी आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप गोटात मोठा आत्मविश्वास पाहायला मिळत आहे तर लातूर जिल्ह्यात झिरो असलेली भाजप हिरो करणारे पालकमंञी संभाजीराव पाटील निलंगेकर यांना माञ या दौ-याने हत्तीचे बळ मिळाले आहे.

एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या लातूर जिल्ह्यात २०१४ च्या मोदी लाटेवर स्वार होवून डाॅॅ.सुनील गायकवाड भाजपचे खासदार बनले.त्यानंतर जिल्हा परिषद,महानगर पालिका व अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपने कमळ फुलविले. या सर्व निवडणूका जिल्ह्याचे भाजपाचे युवा नेते पालकमंञी संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या.त्यामुळे साहजिकच संभाजीराव यांच्या नेतृत्वाची चुणूक राज्यभर पाहायला मिळाली.लातूर लोकसभा मतदारसंघात आज भाजपचे प्राबल्य असून पालकमंञी संभाजीराव पाटील यांनी घेतलेली प्रचंड मेहनत यामुळेच भाजपने जिल्ह्यात हि मुसंडी मारली आहे.

दरम्यान मोदी लाटेला लागलेली ओहोटी, युती होण्याची शक्यता नसल्याने व काँग्रेसची आघाडी यामुळे भाजप वर्तुळात मागील काही दिवसापासून अस्वस्थता पसरली होती.परंतु भाजपचे सर्वेसर्वा अमित शहा यांच्या या झंझावाती दौ-यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पाहायला मिळत आहे.पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या दौ-याचे अत्यंत तगडे नियोजन करुन हा दौरा अत्यंत भव्य-दिव्य व देखणा घडवून आणून संभाजीराव यांनी अमित शहा यांना आपण एक कुशल संघटक असल्याचे दाखवून दिले.अमित शहा यांचा हा दौरा अत्यंत यशस्वी केल्याने भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात संभाजीराव पाटील निलंगेकर या युवा नेतृत्वाच्या कल्पकतेचे मोठे कौतुक होत आहे!

एकुणच पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या या दौ-याने भाजप कार्यकर्त्यांबरोबरच ना.संभाजीराव पाटील निलंगेकर यांना हत्तीचे बळ मिळाले आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.परंतु या दौ-याच्या माध्यमातून या मतदारसंघात सध्या झालेले भाजपमय वातावरण आगामी निवडणूकीपर्यंत टिकवून व पक्षांतर्गत गटबाजी संपुष्टात आणल्यास या मतदारसंघात आगामी निवडणूकीत पुन्हा कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही,हे माञ निश्चित !