मोदींनी ‘रामायण’ सुरु केलं, ठाकरे सरकाने ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिका सुरु करावी

पुणे : छत्रपती संभाजी महाराजांचा खराखुरा इतिहास नवीन पिढीसमोर येणे गरजेचे आहे.आपले राजे किती कर्तृत्ववान होते.त्यांचे विचार व संस्कार नवीन पिढीवर होणे गरजेचे आहे.त्यामुळे संचारबंदी काळात स्वराज्य रक्षक संभाजी” ही मालिका राज्य सरकारने झी मराठी वाहिनीशी बोलून चालू करावी. अथवा सह्याद्री वाहणी वर प्रसारीत करावी. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.

देशात लॉकडाऊनमुळे देशभरात लोक घरात बसून आहेत. या काळात केंद्र सरकारने रामायण आणि महाभारत या मालिका पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांनी घरात बसून राहावे हाच हेतू यामागे असल्याचे स्पष्ट आहे.

दरम्यान, कोरोनाव्हायरसमुळे देशात सुरु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान ‘रामायण’ या धार्मिक मालिकेचे प्रक्षेपण शनिवारपासून दूरदर्शनवर सुरू झालं आहे. सकाळी 9 आणि रात्री 9 वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे. अभिनेता अरुण गोविल यांनी या मालिकेत रामची व्यक्तिरेखा साकारली होती आणि ते आतापर्यंत भगवान राम यांच्या प्रतिमेतून बाहेर येऊ शकले नाहीत.