संभाजीराजेंनी राजकीय दृष्टीकोन बाजूला ठेवून समाजाच्या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे – अशोक चव्हाण

ashok chavan

मुंबई : मराठा आरक्षणावर दिलेली तात्पुरती स्थगिती मागे घेण्यात यावी, यासाठी राज्य सरकारकडून दोन अर्ज सुप्रीम दाखल करण्यात आले आहेत. मराठा आरक्षण प्रकरणात न्या. एल. नागेश्वर राव यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पूर्णपीठासमोर २७ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

या सुनावणीत स्थगिती उठविली जाणार की कायम राहणार? याचा निकाल समोर येण्याची आशा व्यक्त केली जातेय. मराठा आरक्षण स्थागीतीवर खासदार संभाजीराजे कमालीचे आक्रमक होत मराठा समाजाचे नेतृत्व करत आहेत. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

न्यायमूर्ती नागेश्वरराव यांचं जे खंडपीठ होतं, ज्यांनी मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली होती त्याच बेंचसमोर पुन्हा सुनावणी होण्याचा निर्णय खरंच आश्चर्यजनक आहे. हे सर्व प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करून त्यांनी अंतरिम स्थगिती दिली होती.

या प्रकरणाची घटनापीठाकडे म्हणजे मोठ्या बेंचसमोर सुनावणी व्हावी अशी चर्चा झाली आणि त्यांनीच तो निर्णय दिला. मग असं का झालं हा आमच्यासाठी प्रश्नच आहे. आमचीही हीच इच्छा आहे की याची सुनावणी घटनापीठासमोर व्हावी. हे कायदेशीरदृष्ट्यासुध्दा योग्य नाही.

आमची अशी मागणीही नव्हती. मुख्य न्यायाधीशांनी घटनापीठ स्थापन करावा आणि त्यांच्यासमोर ही सुनावणी व्हावी. उद्या आम्ही कायदेतज्ञांशी चर्चा करून या संदर्भात विचारविनिमय करणार आहोत. अस अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

तर राज्यसेवा परीक्षेची स्थगिती आणि खासदार संभाजीराजे यांचे नेतृत्व यावर देखील अशोक चव्हाण यांनी भाष्य केले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या घराण्याबाबत एक आदर आहे. त्यामुळे संभाजीराजे जेव्हा चर्चा करतात तेव्हा त्यांना एका वेगळ्या दृष्टिकोनातून आम्ही बघतो.

व्यापक हित लक्षात घेऊन राज्यसेवा परीक्षेचा निर्णय घेतला आहे. अस अशोक चव्हाण म्हणाले आहेत. तर संभाजीराजे यांनी मी मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहतो. त्यांनी एक विशाल दृष्टिकोन ठेवून समाजातील गरीब, मागास वर्गासाठी ते लढा देत आहेत. आम्हीही त्यांच्या पाठीशी आहोत. राजकीय दृष्टीकोन बाजूला ठेवून समाजाच्या या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे. अस मत चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या-