पश्चिम महाराष्ट्रातील महापुराबाबत संभाजीराजेंनी राज्यसभेत उपस्थित केला महत्वाचा प्रश्न

पश्चिम महाराष्ट्रातील महापुराबाबत संभाजीराजेंनी राज्यसभेत उपस्थित केला महत्वाचा प्रश्न

sambhajiraje

नवी दिल्ली : संसदेचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. देशातील विविध प्रश्नांवरून विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं असून महाराष्ट्रातील पुरस्थितीबाबत मदत मिळण्याबाबत देखील सर्वच प्रतिनिधींनी जोर लावला आहे. २०१९ प्रमाणेच कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागांमध्ये मुसळधार पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती.

३-४ दिवस कोसळणाऱ्या पावसाने उसंत घेतल्यानंतर पूर स्थिती कमी झाली असून दरडी कोसळणे, महापूर यामुळे अनेकांचा संसार उध्वस्त झाला असून शेकडो नागरिकांना आपला प्राण देखील गमवावा लागला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचे वाढलेले प्रमाण, नद्या, ओढे, नाले यांच्या नैसर्गिक प्रवाहात निर्माण झालेले अडथळे आणि इतर कारणांमुळे पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील पुराचा धोका वाढत असून ही समस्या गंभीर ठरत आहे.

यावर भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. याबाबत त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. ‘कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापूरामुळे या शहरांतील जलनिस्सारण व्यवस्था पुरेशी सक्षम नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत आज संसदेत प्रश्न उपस्थित केला,’ अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती लक्षात घेता येत्या पाच वर्षांमध्ये योग्य नियोजन करण्याचे आश्वासन दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या