उदयनराजेंच्या समर्थनाने संभाजीराजेंना अधिक बळ; उदयनराजे आंदोलनाबाबत म्हणाले…

udayanraje and sambhajiraje

पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी ६ जून रोजी रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजी छत्रपती यांची बहुप्रतिक्षीत भेट काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांच्या आधीच ठरलेल्या काही कार्यक्रमांमुळे होऊ शकली नव्हती. त्यामुळे राज्यभरात उलट-सुलट चर्चांना उधान आले होते. मात्र, आज ( १४ जून ) पुण्यात हे दोन्ही राजे भेटले आहेत. या भेटीकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष्य लागलं होतं.

या भेटीनंतर संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी एकत्रच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दोन्ही राजेंनी रोखठोक भाष्य केलं. दरम्यान, संभाजीराजे आणि माझं ध्येय एकच आहे, ते म्हणजे मराठा समाजाला आरक्षण. त्यामुळे समाजाच्या प्रश्नासाठी संभाजीराजेंनी उचललेलं पाऊल हे योग्य आहे, असं म्हणत उदयनराजे यांनी संभाजीराजेंचा १६ जून रोजीच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

आंदोलनामध्ये कोणत्याही पक्षाचा संबंध नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सर्वच पक्षांची समान जबाबदारी आहे. कोर्ट कचेऱ्यांवर माझा विश्वास नाही. व्यक्तिगत स्वार्थासाठी मी किंवा संभाजीराजेंनी कोणतंही कृत्य केलं नाही. मी संभाजीराजेंच्या भूमिकेचं समर्थन करत असून त्यांच्या आंदोलनाला पाठींबा आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आम्ही एकत्र आहोत, मतभेद नाहीत, असं भाष्य उदयनराजे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP