चंद्रकांत पाटील ‘ते’ संभाषण उघड कराचं – संभाजीराजे

मुंबई :  वारीत साप सोडणार असल्याचं बड्या नेत्यांचं संभाषण आमच्या हाती लागल्याचं काल चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हंटलं होतं. त्यावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येतं होती. संभाषण हाती लागलं असल्यास चंद्रकांत पाटील यांनी ते सादर करावं अशी मागणी देखील अनेक नेत्यांकडून करण्यात येत होती. दरम्यान आता खासदार संभाजीराजे यांनी देखील चंद्रकांत पाटील यांनी त्या संभाषणाची क्लिप उघड करावी अशी मागणी केली आहे.

यावेळी बोलताना संभाजीराजे भोसले म्हंटले की, अशी विकृत कल्पना मराठयांच्या मनात येणे कदापी शक्य नाहीये. मला पूर्ण विश्वास आहे. वारीला सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे. मात्र वारीच्या इतिहासात असं कधी झालं नाही. सरकार खोटं तर बोलतं नाहीयेना, हे सिद्ध करण्यासाठी ती संभाषणाची क्लिप जनतेसमोर आणावी. अशी मागणी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली.

घटनेत बदल करुन मराठा समाजाला आरक्षण द्या : शरद पवार

आरक्षण आर्थिक निकषावरचं असावं, जातीय निकषावर नको – राज ठकरे

You might also like
Comments
Loading...