VIDEO : शेतकऱ्याच्या रानात स्वतः छत्रपतींनी ओढली तिफन…

sambhaji raje

कोल्हापूर : राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. संपूर्ण जग लॉकडाऊन असताना बळीराजा मात्र यादरम्यानही काम करीत होता. तो थांबून चालणार नाही. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या फेसबुकवरुन एक भावुक व्हिडीओ शेअर केला आहे.

स्वत:च्या शेतातून घरी येत असताना वाटेत शेतकऱ्याचे एक कुटुंब शेतात पेरणी करत असताना त्यांना दिसले. त्या ठिकाणाहून गाडी पुढे गेली होती. मात्र संभाजीराजांना रहावलं नाही. त्यांनी गाडी वळवली आणि त्या शेतात गेले. सुरुवातील त्यांना संकोच वाटल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. मात्र ते पुढे गेले व त्यांनी शेतकऱ्यासह तिफन हाती घेतलं. हा अनुभव खूप समृद्ध करणारा होता, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

शेतकऱ्यांच्या पायाला भेगा का पडतात?? याचा अनुभव घेता आला

शेतकऱ्याच्या पायाला भेगा का पडतात? स्वतःच्या घामाने धरतीला भिजवून जगाला पोसणाऱ्या बळीराजाला किती कष्ट सोसावे लागतात? याचा अनुभव घेता आला. तिफणीला ओढताना एका फेरीतच माझा श्वास फुलून गेला, मला लगेच मास्क काढून ठेवावा लागला.(अंगमेहणीतीचे काम नसताना, इतरवेळी सर्वांनी मास्क वापरणे गरजेचे आहे.) कोरोना मुळे संपूर्ण जगाला थांबावं लागलं. पण बळीराजाला थांबून चालणार नाही, अन तो थांबणारही नाही.मी स्वतःच्या शेतातून घरी येत असताना, वाटेत एक संपूर्ण कुटुंब शेतात पेरणी करत असताना दिसले. गाडी पुढे गेली, पण मला ते दृश्य पाहून राहवलं नाही. परत गाडी वळवली आणि त्यांच्याकडे गेलो. सुरुवातीला संकोच वाटला की मी कसा जाऊ? त्यांना कसं विचारू? परंतु न कळत मी त्यांच्या रानात ओढला गेलो. हा अनुभव मला समृद्ध करून गेला. जगाच्या पोशिंद्या शेतकरी राजाचे संपूर्ण जगाने ऋण व्यक्त करत त्यांचा सन्मान केला पाहिजे.

Posted by Yuvraj Sambhajiraje Chhatrapati on Saturday, June 13, 2020

शेतकऱ्याच्या पायाला भेगा का पडतात? स्वतःच्या घामाने धरतीला भिजवून जगाला पोसणाऱ्या बळीराजाला किती कष्ट सोसावे लागतात? याचा अनुभव घेता आला. तिफणीला ओढताना एका फेरीतच माझा श्वास फुलून गेला, मला लगेच मास्क काढून ठेवावा लागला. (अंगमेहणीतीचे काम नसताना, इतरवेळी सर्वांनी मास्क वापरणे गरजेचे आहे.) कोरोना मुळे संपूर्ण जगाला थांबावं लागलं. पण बळीराजाला थांबून चालणार नाही, अन तो थांबणारही नाही. अस छत्रपती संभाजीराजे म्हणाले आहेत.

एवढ्या’ पैशात होणार आता खासगी लॅबमध्ये कोरोना टेस्ट, यापेक्षा जास्त एक रुपयाही देऊ नका

तर मी स्वतःच्या शेतातून घरी येत असताना, वाटेत एक संपूर्ण कुटुंब शेतात पेरणी करत असताना दिसले. गाडी पुढे गेली, पण मला ते दृश्य पाहून राहवलं नाही. परत गाडी वळवली आणि त्यांच्याकडे गेलो. सुरुवातीला संकोच वाटला की मी कसा जाऊ? त्यांना कसं विचारू? परंतु न कळत मी त्यांच्या रानात ओढला गेलो. हा अनुभव मला समृद्ध करून गेला. जगाच्या पोशिंद्या शेतकरी राजाचे संपूर्ण जगाने ऋण व्यक्त करत त्यांचा सन्मान केला पाहिजे. आशा भावना खासदार संभाजी राजेंनी व्यक्त केल्या.

महाविकास आघाडीत धुसफूस, नाराज कॉंग्रेस नेते घेणार थेट उद्धव ठाकरेंची भेट